आटपाडी टाइम्स न्युज : नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा यांची वनडे संघात निवड न झाल्याने क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत. सॅमसनने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर त्याची वनडेत निवड झाली नाही. दुसरीकडे, झिम्बाब्वे दौऱ्यावर अभिषेकने शानदार शतक झळकावले. असे असूनही त्याला संघात स्थान मिळवता आले नाही.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची निवड न केल्यामुळे काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी संघ निवडीवर टीका केली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत अभिषेकने आपल्या निडर फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. पंजाबच्या या फलंदाजाने आपल्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले होते, पण नंतर यशस्वी जैस्वाल संघात आल्यावर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु लागला.
शशी थरूर यांनी काय लिहिले?
शशी थरूर यांनी लिहिले की, “या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड मनोरंजक आहे. आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनची वनडे संघात निवड झालेली नाही. त्याचवेळी भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेत टी-२० शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माची कोणत्याच संघात निवड झालेली नाही. त्यामुळे क्वचितच भारताच्या जर्सीतील यशाचा रंग निवडकर्त्यांसाठी इतका महत्त्वाचा असेल. तरीही संघाला शुभेच्छा.”
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ :
भारताचा टी-२० संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.