सांगली जिल्ह्यातील “या” घटकातील बचत गटांना मिळणार मिनी टॅक्टर : 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावा लागणार

0
27

आटपाडी टाइम्स न्युज : सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी योजनेच्या निकषानुसार व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

योजनेचे निकष – अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. स्वयंसहायता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती घटकातील असावेत. स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचत गट नोंदणीकृत असावा.

 

प्रस्तावास आवश्यक कागदपत्रे – स्वयंसहायता बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र (तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती इ.). स्वयंसहायता बचत गटाच्या नांवे असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स व या खातेशी अध्यक्ष व सचिव यांचे आधारलिंक असलेचा पुरावा. स्वयंसहायता बचत गटाचा ठराव व सभासद यादी. स्वयंसहायता बचत गटातील सर्व सदस्यांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे दाखले.

 

स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले रहिवाशी पुरावे. (डोमेसाईल). स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे आधारकार्ड झेरॉक्स. 100 रू स्टँम्पवर ट्रॅक्टर खरेदीबाबतचे हमीपत्र. सर्व कागदपत्रे ही साक्षांकीत केलेली असावीत.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता इच्छुक बचत गटांनी दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहीतीसाठी समाज कल्याण सांगली कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here