आटपाडीत लाडक्या सर्जा-राजाच्या पुढे शेतकरी बेधुंद होऊन नाचले

0
21
आटपाडीत लाडक्या सर्जा-राजाच्या पुढे शेतकरी बेधुंद होऊन नाचले
आटपाडीत लाडक्या सर्जा-राजाच्या पुढे शेतकरी बेधुंद होऊन नाचले

आटपाडी टाइम्स न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यासह शहरात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मिरवणुकीत हलगीच्या तालावर तसेच डीजेच्या ठेक्यावर बळिराजा आपल्या लाडक्याद सर्जा, राजासमोर बेधुंद होऊन नाचला.

शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी बेंदूर सण बळिराजा उत्साहात साजरा केला जातो. बेंदरा निमित्त बैलांना अंघोळ घालून अंगावर झूल घातली जाते. शिंगांना रंग व फुगे बांधून गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

आटपाडी शहरातील बस स्थानक, ते मुख्य रस्त्यावरून बैलांना घेवून अनेक शेतकरी मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. यावेळी मिरवणुकीमध्ये अनेक युवा नेत्यांनी सहभाग घेतला होता. आज पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने मिरवणुकामध्ये कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here