आटपाडी टाइम्स न्युज: आटपाडी/प्रतिनिधी : ‘8860001726 या नंबरला मिस कॉल द्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या’ या अभिनव योजनेची सुरुवात सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण समिती ब्रम्हानंद पडळकर यांच्या शुभहस्ते आटपाडी येथील आण्णाभाऊ साठे चौक येथून करण्यात आली.
यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, आटपाडी तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, यांच्यासह युवा नेते चंद्रकांत दौंडे, विनायक पाटील, आटपाडी बाजार समितीचे माजी संचालक विष्णू अर्जुन, विलास काळेबाग, संदीप ठोंबरे, चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन राहुल सपाटे, विकास भुते, सागर मासाळ, संतोष शिंदे, अनिल हाके, अनिल सुर्यवंशी, आबासो भानवसे, संग्राम नवले, महिला तालुकाध्यक्ष अश्विनी कासार, आटपाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर, महिला बालकल्याणच्या दुर्गा पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांना धन्यवाद देतो, की त्यांच्या संकल्पेतून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. आज आटपाडी शहराच्या विविध भागामध्ये या योजनेची माहिती बाबत व लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. शेवटच्या बहिणी पर्यंत आमचा पोहचण्याचा पर्यंत आहे.
तसेच 8860001726 मोबाईल क्रमांकावरती मिसकॉल दिल्यास, फॉर्म भरून घेण्यासाठी कार्यकर्ते घरी जाणार असून, सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या असे आवाहन देखील ब्रम्हानंद पडळकर यांनी केले. यावेळी भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, संदीप ठोंबरे, चंद्रकांत दौंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.