विभूतवाडी येथील जवान जम्मु काश्मीर मध्ये शहीद

0
24

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावाचे सुपुत्र केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये हवालदार या पदावर कार्यरत असणारे काकासाहेब दादा पावणे हे जम्मु काश्मीर मध्ये शहीद झाले आहेत. दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 नंतर विभूतवाडी ता.आटपाडी येथे अंत्यविधी होणार आहे.

काकासाहेब पावणे यांचे शिक्षण विभूतवाडी येथे झाले असून, माध्यमिक शिक्षण हे झरे येथे झाले होते. ते भारतीय लष्करी सेवेत २००७ मध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,आई,भाऊ,भवजय, मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, सदरची घटना कशी घडली, याबाबत अद्याप समजू शक्नी नाही. सदर घटनेमुळे विभूतवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here