आटपाडी टाइम्स न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून आटपाडी वकील संघटनेमार्फत तहसीलदार आटपाडी यांना निवेदन देण्यात आले.
सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके सोडून इतर सोलापूर जिल्ह्याकरिता अशा सहा जिल्ह्या करिता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून गेली अनेक वर्षे झाले या सहा जिल्ह्यातील वकील वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करीत आहेत. लवकरच आम्ही कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ करू म्हणून शासनामार्फत वेळोवेळी सांगण्यात येत आहे परंतु आज अखेर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय शासनाने घेतला नसल्यामुळे पुन्हा आंदोलन चा एक भाग म्हणून पहिल्यांदा या सहा जिल्ह्यातील सर्व वकील संघटना यांनी शासनाकडे निवेदन पाठविण्याचे ठरले.
त्यानुसार आटपाडी वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी तहसीलदार सागर ढवळे यांना निवेदन दिले. या प्रसंगी वकील संघटनेच्या अध्यक्षा सोनाली कुलकर्णी, उपाध्यक्ष दिलीप पाटील सचिव सुजित लाळे, माजी अध्यक्ष धनंजय पाटील, विलास पाटील, पी.डी.जेडगे, विलास देशमुख, राम इनामदार, सचिन सातपुते, अश्पाक आतार, महेश मोरे, निहाल पटेल, मिथुन भोसले, महेश पाटील, हिंगमिरे, लतिका माळी व इतर सदस्य उपस्थित होते.