आटपाडी टाइम्स न्युज : खरसुंडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सिद्धनाथ नगरी खरसुंडी येथे मुख्य्र रस्त्यावरील श्री सिद्धनाथ ज्वेलर्सवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकत तब्बल तीन लाख सतरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुरज अशोक गायकवाड (वय 37), रा. चिंचाळे यांचे खरसुंडी येथील मुख्य रस्तावर श्री सिद्धनाथ ज्वेया नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून ते घरी गेले होते. परंतु दि. 20/07/2024 रोजीच्या रात्री व दि. 21/07/2024 रोजीचे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सवर दरोडा टाकला.
यामध्ये 2,92,500 रु.चांदीचे पैंजण वेगवेगळ्या डिजाईनचे एकूण 40 नग, चांदीचे लहान-मोठे ब्रेसलेट,10 नग वेगवेगळ्या वजनाचे चांदीचे सरदार कडे,08 नग वेगवेगळ्या वजनाच्या चांदीच्या चैन, 30 नग वेगवेगळ्या वजनाचे चांदीच्या गणपती, सरस्वती, सिद्धनाथ घोडे, पाळणे, तुरा,इ.वेगवेगळ्या मुर्त्या मुर्त्या 06 नग चांदीचे लहान मुलांचे तोडे वाळे त्याचे एकूण अंदाजे वजन 04 ते 4.500 की.ग्रॅ. तसेच २५०० रोख रक्कम असे एकूण तीन लाख सतरा हजार पाचशे रुपयांची चोरी करण्यात आली.
तसेच सिद्धनाथ हार्डवेअर मधील किरकोळ चिल्लर 15 ते 20 हजार रुपये व प्रसाद जालिंदर जावीर यांच्या पान स्टॉल मधील 4000 ते 5000 रुपयाची चिल्लर अशी एकूण रक्कम 3,17,5000/- रुपयाचे चांदीचे दागिने व रोख रककम अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत सुरज अशोक गायकवाड यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.