मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचे विरोधक बनू शकतात. त्यांच्यापासून सावध राहा. आज तुम्हाला नियोजनपूर्वक काम करावे लागेल. व्यवसायात नवीन उपकरणांचा समावेश केला तर तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुमच्या यशाच्या मार्गात कोणता अडथळा येत असेल तर तो आज दूर होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांची आज मनोकामना पूर्ण होईल. आज तुम्ही अधिक खर्च कराल. तुमच्या उत्पन्न आणि खर्चाचा बजेट तयार करा. तरच तुम्हाला भविष्यात फायदा होईल. जीवनसाथी प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला राहील. पिकनिकला जाण्याचा बेत आखाल.
मिथुन : आज प्रॅक्टिकली विचार कराल तर लाभ होईल. एखाद्या धार्मिक ठिकाणी काही काळ एकांतात घालवाल. आज तुमच्या मनात एखादा विचार घोंघावत राहील. त्यामुळे थोडा संभ्रम निर्माण होईल. सकारात्मक विचार करून कार्य तडीस न्याल. प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं. आज तुमच्याबाबत असंच घडणार आहे. आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी बसेल. नोकरी करणाऱ्यांना आज बढती मिळण्याची शक्यता आहे.
कर्क : आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. घरातील सर्व सदस्यांसोबत तुमची चांगली बाँडिंग होईल. व्यापारी वर्गाला नवीन ऑर्डर मिळेल. काम चांगलं चालेल. त्यामुळे तुम्हाला अधिक लाभ होईल. आज जीभेवर खडीसाखर ठेवा. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. आज नवीन काही शिकायला मिळेल.
सिंह : तुमच्यावर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी असेल. दूरच्या ठिकाणी शिक्षणासाठी गेलेल्यांची आज आईवडिलांसोबत भेट होईल. आज दु:खद बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबीयांसोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दूरच्या नातेवाईकांकडून काही बातमी येण्याची शक्यता आहे. अवाजवी खर्च टाळा. भविष्यातील एखाद्या योजनेसाठी पैसे राखून ठेवा. एखाद्या स्पर्धा परीक्षेला बसण्याची विद्यार्थी तयारी करतील. वाहन खरेदीचा योग आहे.
कन्या : आज तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटेल. मित्राला भेटल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. घरापासून लांब नोकरी करणाऱ्यांना आज कुटुंबीयांना भेटता येणार आहे. तुम्ही काही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. तुम्ही आज एखादा कॉम्प्युटर कोर्स शिकण्याचा निर्णय घ्याल. जमिनीशी संबंधित प्रकरणावर कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. व्यसनांवर नियंत्रण ठेवा.
तुळ : तुमचा विनम्र स्वभाव सर्वांच्या पसंतीला उतरेल. तुमची संपत्ती कुठे खर्च होत आहे याकडे तुमचं लक्ष राहील. विनाकारण कोणत्याही वादात पडू नका. नाही तर अडचणी वाढतील. प्रचंड धावपळ होत असूनही आज तुम्ही तुमच्यासाठी थोडासा वेळ काढाल. बाहेरचे तळलेले पदार्थ खाऊ नका. नाही तर आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. जीवनसाथीच्या सहकार्याने घरातील सर्व कार्य पूर्ण कराल. धार्मिक कार्यात रमून जाल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल.
वृश्चिक : मित्रांसोबत पार्टीचा बेत आखला जाईल. आईवडिलांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठिशी आहे. आज ऑफिसमध्ये तुम्ही स्वत:ला सिद्ध करून दाखवाल. तुमचा वाढदिवस मित्रमंडळी अत्यंत थाटात साजरा करतील. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. खरेदीवर अधिक भर द्याल. जमीनजुमल्याचे प्रश्न मार्गी लागतील. अंगदुखी जाणवू लागेल. समुद्र किनारी फिरायला जाण्याचा योग आहे.
धनु : तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल कराल. त्यामुळे कामे पटकन मार्गी लागतील. मुलाच्या करिअर बाबत जाणकार व्यक्तीशी सल्लामसत कराल. मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोठा निर्णय घ्याल. कोणतंही काम करताना रागावू नका. रागावर नियंत्रण ठेवा. विधी क्षेत्राशी संबंधित लोकांना आजचा दिवस आनंदाचा जाईल. एखाद्या मोठ्या वकिलाची भेट होण्याची शक्यता आहे. प्रेयसीकडून भेटवस्तू मिळेल.
मकर : एखादा जुना मित्र तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो. त्याला तुम्ही निराश नाही करणार. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही मित्राला आर्थिक मदत करालय. आज तुमची खोळंबलेली सर्व कामे मार्गी लागतील. घराशी संबंधित समस्यांचा विचार कराल. एखादा प्रेरणादायी पुस्तक किंवा सिनेमा पाहणं योग्य ठरेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचं फळ मिळेल.
कुंभ : जीवनसाथीसोबत नव्या कामाची सुरुवात कराल. आज काही तरी मोठं आणि वेगळं करण्याचा विचार कराल. मुला-मुलींच्या भविष्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत कराल. या राशीच्या महिलांचा दिवस आज व्यस्ततेत जाईल. मात्र संध्याकाळी आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. कार्यालयीन कामात उच्चपदस्थांची साथ मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील.
मीन : कुटुंबीयांसोबत सिनेमा पाहायला जाण्याचा बेत आखाल. लहानपणीच्या मित्राची अचानक भेट होईल. त्यामुळे आजचा दिवस चांगला जाईल. आर्थिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्याल. पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. विवाहितांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. लग्नाळूंना आज आनंदाची बातमी मिळेल. हनीमूनला जाताना काळजी घ्या, आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. जुनी लफडी डोकं वर काढतील, त्यामुळे सामंजस्याने प्रश्न सोडवा.
(सूचना : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)