“चाय पे चर्चा” च्या माध्यमातून ब्रम्हानंद पडळकर यांनी साधला जनतेशी संवाद : प्रत्येक गावात जात युवकवर्ग ,वृद्ध महिला भगिनींच्या अडीअडचणी समजावून घेणार

0
24
आटपाडी : करगणी येथे येथे "चाय पे चर्चा" माध्यमातून जनतेशी संवाद साधताना माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर व उपस्थित मान्यवर
आटपाडी : करगणी येथे येथे "चाय पे चर्चा" माध्यमातून जनतेशी संवाद साधताना माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर व उपस्थित मान्यवर

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघांमध्ये तयारी सुरू केली आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनीही विधानसभेचे मैदान मारणारच या इराद्याने निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

 

गेल्या दोन महिन्यापासून त्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये घोंगडी बैठका, चाय पे चर्चा, मेळावे, कार्यकर्ता संवाद या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. सर्वसामान्य नेतृत्व असलेले गोपीचंद पडळकर व ब्रम्हानंद पडळकर यांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रथमच विटा शहर, विटा ग्रामीण भाग, घाटमाथा वरील गावे, विसापूर सर्कल यामध्ये पडळकर बंधूंनी भाजपचा गट मजबूत केला आहे. याचबरोबर शासनाच्या विविध योजना या प्रत्येक गावापर्यंत प्रभावीपणे राबवल्या आहेत. आमदार फंड असो किंवा अन्य निधी हा प्रत्येक गावामध्ये वितरित केला आहे.

विविध विकास कामांच्या माध्यमातून जन सुविधा पुरविण्याचे काम केले आहे. सत्ता ही सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी वापरायचे असते याचे आदर्श उदाहरण पडळकर बंधूंनी घालून दिले आहे. यामुळेच त्यांना खानापूर विधानसभा मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आमदार गोपीचंद पडळकर व ब्रम्हानंद पडळकर यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना सर्वसामान्य महिले पर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम राबवली असून प्रत्येक गावामध्ये मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकातून योजनेची माहिती देत महिलांच्या कडून गल्ली- बोळात जाऊन फॉर्म भरून घेतले जात आहेत. पात्र महिलांना याबाबत योग्य माहिती दिली जात आहे. प्रथमच असा उपक्रम राबवल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून, पडळकर बंधू हेच खरे विकास दूत असल्याची भावनाही महिला वर्गातून व्यक्त केली जात आहे.

ब्रम्हानंद पडळकर यांनी शनिवारी आटपाडी तालुक्यातील करगणी येथे “चाय पे चर्चा” माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी तात्यासाहेब होनमाने, सोमनाथ सरगर, नाथा सरगर, तुकाराम जानकर, प्रकाश सरगर, दादासाहेब होनमाने, बाळासाहेब सरगर, सुनील पुकळे, अण्णा सरगर, रमेश मंडले, लायन मंडले, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांशी ब्रम्हानंद पडळकर यांनी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here