आटपाडी टाइम्स न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी येथे दिनांक २१ रोजी सकाळी ८.०० पासून १.०० वाजे पर्यंत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ फॉर्म भरून घेण्यासाठी आम. गोपीचंद पडळकर व माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन येणार असून आंबेवाडी परिसरातील सर्व महिलांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन आंबेवाडीच्या सरपंच विद्या पुजारी यांनी केले आहे.
खानापूर मतदार संघातील सर्व महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेला लाभ मिळावा यासाठी आम. गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पेतून ‘मिस कॉल द्या’ या मोबाईल व्हॅनचा प्रकारचा शुभारंभ माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला होता.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेसाठी फॉर्म भरताना सुरुवातीला मोठ्या प्रमाणत गर्दी झाली होती. याचा गर्दीचा फायदा अनेकांनी घेत महिलांना आर्थिक भुर्दंड बसत होता. त्याच बरोबर महिलांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाया जात होता.
सदरची बाब आम. गोपीचंद पडळकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संपूर्ण मतदार संघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना कोणताही त्रास होता कामा नये याबाबत दक्षता घेतली. त्यांनी संपूर्ण खानापूर मतदार संघामध्ये सदर योजनेच्या प्रचारासाठी मोबाईल व्हॅन तैनात केल्या होत्या. त्यामुळे दिनांक २१ रोजी सकाळी ८.०० वाजता या मोबाईल व्हॅन आंबेवाडी येणार असल्याने परिसरातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.